चालू घडामोडी : 02 एप्रिल 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
221

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 02 April 2020 | चालू घडामोडी :०२ एप्रिल २०२०


चालू घडामोडी – या वर्षीची विम्बल्डन स्पर्धा रद्द 

  • करोनामुळे ब्रिटनमधील परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा रद्द करण्याची वेळ संयोजकांवर ओढवली आहे.
  • फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा तसेच ७ जूनपर्यंतच्या सर्व स्पर्धा रद्द झाल्यामुळे आता ऑल इंग्लंड क्लबकडे नैसर्गिक हिरवळीवर होणारी ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा रद्द करण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नव्हता. २८ जूनपासून ही स्पर्धा सुरू होणार होती.
  • मात्र संपूर्ण जग करोनासारख्या भीषण परिस्थितीचा सामना करत असताना ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय अखेर संयोजकांनी घेतला आहे. बुधवारी याबाबतची घोषणा करण्यात आली.
  • ‘‘करोनामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असताना ऑल इंग्लंड क्लबचे मुख्य मंडळ तसेच व्यवस्थापन समिती ही स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करत आहे.
  • ब्रिटनमधील जनता, परदेशातून येणारे चाहते तसेच खेळाडू, पाहुणे, सदस्य, कर्मचारी, स्वयंसेवक, कंत्राटदार यांच्या आयुष्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचबरोबर समाजाचे हित जपण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही स्पर्धा रद्द करत आहोत. तिकीट विकत घेतलेल्यांचे सर्व पैसे परत केले जातील अथवा पुढील वर्षी त्याच दिवशीचे तिकीट त्यांना दिले जाईल. सर्व तिकिटधारकांशी आम्ही वैयक्तिकपणे संपर्क साधणार आहोत,’’ असे ऑल इंग्लंड क्लबच्या पत्रकात म्हटले आहे.
  •  तीन वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारा बोरिस बेकर याने अंतिम निर्णय घेण्याआधी संयोजकांनी बराच वेळ घ्यावा, अशी विनंती के ली होती.
  • ‘‘एप्रिलच्या अखेरीस विम्बल्डनच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात यावा. संयम हाच त्यावर एकमात्र उपाय आहे,’’ असे बोरिस बेकरने म्हटले होते. तसेच २००६ साली विम्बल्डन जिंकणारी अव्वल महिला टेनिसपटू अ‍ॅमेली मॉरेस्मो हिने यंदाची विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

# Current Affairs


चालू घडामोडी – डकवर्थलुइसचे जनक टोनी लुइस यांचे निधन

  • क्रिकेटमधील डकवर्थ-लुइस प्रणालीचे जनक टोनी लुइस यांचे बुधवारी लंडन येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) ही घोषणा केली.
  • टोनी यांनी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत डकवर्थ-लुइस पद्धत १९९७ मध्ये अमलात आणली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १९९९ मध्ये ती स्वीकारली.
  • डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास गणिताची आकडेमोड करत षटके कमी करण्यात येतात. लुइस यांची ही प्रणाली क्रिकेटमध्ये चांगलीच गाजली. अजूनही सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ-लुइस प्रणालीचा आधार घेतला जातो.
  • लुइस यांना क्रिकेट आणि गणितातील या संशोधनाबद्दल ‘एमबीई’ या ब्रिटनमधील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘आयसीसी’कडून लुइस यांना श्रद्धांजली

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टोनी लुइस यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. ‘‘सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास धावांचे लक्ष्य ठेवण्याची पद्धत लुइस आणि फ्रँ क यांनी दोन दशकांपूर्वी नव्याने अमलात आणली.
  • लुइस यांचे योगदान सदैव स्मरणात राहील,’’ असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – रीड द वर्ल्ड’: वाचनाला प्रोत्साहन देणारा IPA, WHO आणि UNICEF या संस्थांचा संयुक्त उपक्रम

  • कोविड-19 महामारीमुळे जगभरात लागू केलेल्या संचारबंदीमुळे घरातच अडकलेल्या लोकांना तसेच लहान मुला-मुलींना वाचनाची आवड लागावी यासाठी प्रोत्साहन देणारा ‘रीड द वर्ल्ड’ उपक्रम आंतरराष्ट्रीय प्रकाशक संघ (IPA), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या संस्थांच्या पुढाकाराने राबविला जात आहे.
  • 2 एप्रिल 2020 रोजी आंतरराष्ट्रीय बाल पुस्तके दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन इटलीच्या ‘गेरोनिमो स्टिल्टन’ या मुलांच्या पुस्तकांची मालिकेच्या लेखकांनी केले. लेखक एलिसाबेटा डॅमी यांनी ‘गेरोनिमो स्टिल्टन’ या लोकप्रिय पात्राची रचना केली.

आंतरराष्ट्रीय प्रकाशक संघ (IPA)

  • IPA हे जगातल्या प्रकाशक संघटनांचा प्रमुख संघ आहे. संघाची स्थापना 1896 साली झाली.
  • या संस्थेचे उद्दीष्ट प्रकाशनास प्रोत्साहन आणि संरक्षण देणे तसेच आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी एक शक्ती म्हणून प्रकाशनाबद्दल जागरूकता वाढवणे आहे.
  • संघाचे मुख्यालय झ्यूरिचहून स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा या शहरात आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

  • WHO ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे.
  • दिनांक 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन करण्यात आली .
  • WHOचे जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.
  • हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाची एक सदस्य संस्था आहे.
  • ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.

सयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)

  • UNICEF बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे. संस्था जगातल्या सर्वात वंचित बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करते.
  • संस्थेची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्युयॉर्क शहर (अमेरिका) येथे आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – IISc बंगळुरूमध्ये ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर विकसित केले .

  •  बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमधल्या वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांनी ‘प्रोजेक्ट प्राण’ अंतर्गत स्वदेशी व्हेंटिलेटर उपकरण तयार केले आहे.
  • त्यासाठी लागणारे सुटे भाग वाहननिर्मिती उद्योग आणि RO वॉटर फिल्टर उद्योगांकडून घेतले गेले आहेत.
  •   कोविड-19 महामारीसाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने व्हेंटिलेटर उपकरणांची अत्याधिक गरज भासत आहे. आयात केलेल्या सुटे भागांची कमतरता दूर करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे.
  •  व्हेंटिलेटरमध्ये वाहनामध्ये वापरल्या जाणारे प्रेशर सेन्सर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर फिल्टर हे भाग महत्त्वाचे असतात.
  •  मोठ्या प्रमाणात उपकरणांच्या उत्पादनासाठी संस्था त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान कोणत्याही उद्योगाला विनामूल्य हस्तांतरित करण्यास तयार आहे आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) या कंपनीने यापूर्वीच प्रणालीमध्ये रस दर्शविला आहे.

 # Current Affairs

आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम