दिनविशेष : 01 नोव्हेंबर जागतिक शाकाहार दिन
१८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
01 नोव्हेंबर : जन्म
१८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.
१८९३: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ – कोलकता, पश्चिम बंगाल)
१९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)
१९२६: संगीत दिग्दर्शक कवी रेडिओ वरील सुगम संगीत विभाग प्रमुख, शब्द प्रधान गायकी चे लेखक यशवंत देव यांचा पेण येथे जन्म.
१९३२: कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.
१९४०: भारताचे ३५वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.
१९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
१९६०: अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा जन्म.
१९६३: भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.
१९७३: अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा जन्म.
१९७४: क्रिकेटपटू वी. वी. एस. लक्ष्मण यांचा जन्म.
01 नोव्हेंबर : मृत्यू
१८७३: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.
१९५०: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)
१९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.
१९९१: संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.
१९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन.
१९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.
१९९६: श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)
२००५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)
२००७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन.
01 नोव्हेंबर : महत्वाच्या घटना
१६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.
१७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.
१८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
१८४५: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.
१८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
१८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.
१९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.
१९२८: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.
१९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents