चालू घडामोडी : ०१ मार्च २०२०

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
137

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 01 March 2020 | चालू घडामोडी : ०१  मार्च २०२०

चालू घडामोडी – उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई

  • उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर दिल्ली पोलिसांनी देखील उत्तर-पूर्व दिल्लीतील धार्मिक हिंसेदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई हिंसा करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तर या हिंसेत वैयक्तीक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या योजनेत काम करणाऱ्या पोलिसांनी नाव न छापण्याची अटीवर ही माहिती दिली आहे.
  • गुन्हे अन्वेशन विभाग आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) तसेच लोकल पोलिसांना या संदर्भात आधीच सूचना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नुकसानीची माहिती घेण्यासाठी नगर विकास अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही मिळाल्याचे समजते.
  • तसेच उत्तर-पूर्व दिल्लीत मागील चार दिवसांत संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचे काम एसआयटीकडे सोपविण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यासह अनेक स्थानिक गुन्हेगारांनी जाफराबाद, कर्दमपुरी, करावल नगर, मौजपूर, भजनपूर आणि अन्य भागांतील हिंसक घटनांचा फायदा घेतला आहे.
  • दरम्यान दिल्ली पोलिसांना आतापर्यंत हिंसा घडविणाऱ्यांची एक हजार जणांची ओळख पटली आहे. यापैकी 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हिंसेत झालेल्या नुकसानीचं आकलन करण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र रविवार ते बुधवार या कालावधीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण

  • मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
  • तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुरुवातीला शिक्षणासाठी हे आरक्षण दिले जाईल आणि नोकऱ्यांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. या आरक्षणास शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
  • तसेच विधानपरिषदेत शरद रणपिसे, भाई जगताप आदींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात येईल, अशी घोषणा केली.
  • मुस्लिम समाजाला 9 जुलै 2014 रोजी अध्यादेश काढून पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबर 2014 रोजी अंतरिम आदेशाद्वारे शिक्षणामध्ये दिलेले आरक्षण वैध ठरविले, तर नोकऱ्यांमधील आरक्षणाला स्थगिती दिली. पण अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर न झाल्याने 23 डिसेंबर 2014 रोजी अध्यादेश संपुष्टात आला.
  • मात्र न्यायालयाने आरक्षण लागू काळातील शिक्षण संस्थांमध्ये दिले गेलेले प्रवेश आणि नोकऱ्या अबाधित ठेवल्या असून प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षणात आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढून नोकऱ्यांमध्ये ते देण्याबाबत पुढील टप्प्यात निर्णय घेतला जाईल, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

# Current Affairs


चालू घडामोडी – पाकिस्तान सरकराचा अजब निर्णय

  • पाकिस्तानच्या संसद परिसरात आता महिलाखासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
  • संसदेतीलमहिला समितीने संसदीय परिसरात ब्युटी पार्लर सुरू करण्यास सांगितले आहे. आयएनएसने पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार हवाला देताना म्हटलं आहे की, हा मुद्दा महिला खासदारांनी उपस्थित केला होता.
  • तर त्यांनतर संसद भवन गृहनिर्माण समितीची बैठक झाली. आणि या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरू केले जाईल.
  • इतकेच नव्हे तर महिला खासदारांच्या सूचना असूनही संसद परिसरात निश्चित केलेल्या ठिकाणी ब्युटी पार्लर का उघडले नाही, यासाठी समितीने भांडवल विकास प्राधिकरणास (सीडीए) फटकारले आहे.
  • तर समितीच्या संयोजकांना संसद परिसरात ब्युटी पार्लरसाठी जागा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे देशात आर्थिक परिस्थिती चांगली नसताना सुद्धा खासदार जनतेचे पैसे ब्युटी पार्लरवर उडवणार असल्याच्या निर्णयावरून तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  जादव पायेंग यांना ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार’ जाहीर

  • ‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या वतीने यावर्षीच्या ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी’ पुरस्कारासाठी जादव पायेंग यांची निवड करण्यात आली आहे. मानवनिर्मित जंगल तयार करण्याच्या त्यांच्या सतत प्रयत्नांसाठी जादव पायेंग यांना सहावा कर्मयोगी पुरस्कार दिला जात आहे.
  •  पायेंग यांना हा पुरस्कार 29 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत एका सोहळ्यात दिला जाणार आहे.

जादव पायेंग (द फॉरेस्ट मॅन)

  •  जादव पायेंग हे भारतातले फॉरेस्ट मॅन म्हणून लोकप्रिय आहेत. ते एक पर्यावरणवादी आणि वन कामगार आहे. ते आसाम राज्याच्या जोरहाट गावाचे रहिवासी आहेत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी वाळवंटीकरणाला आळा घालण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीच्या लगत एकट्यानेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत आहेत. त्यांच्या त्या प्रयत्नातून मिळालेले फलित म्हणजे आज तिथली भूमी वन आच्छादित असून ते अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्य प्राण्यांचे घर आहे.

 # Current Affairs


चालू घडामोडी – लेफ्टनंट जनरलपदी डॉ. माधुरी कानिटकर

  • लष्करात उच्चपदी पोहोचलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी लष्करात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळण्यासाठीची एक मोठी लढाई महिलांनी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच जिंकली असताना मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली. कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड गेल्या वर्षीच झाली होती, पण जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. या उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत.
  •  नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.
  • डॉ. कानिटकर यांनी लष्करात ३७ वर्षे सेवा केली आहे. सीडीएस-वैद्यकीय पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही सेवांबाबत (हवाई दल, नौदल आणि स्थलसेना) केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम त्या करतील. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना लेफ्टनंट जनरल कानिटकर म्हणाल्या, ‘‘भारतीय लष्कराचे कामकाज महिलांच्या दृष्टिकोनातून विचार करता पारदर्शक, न्याय्य असून महिलांना तेथे कर्तृत्व दाखवण्याची संधी निश्चितच मिळते.
  • लष्करी वेशात असतानाही प्रत्येक दिवस मुलाच्या उत्साहात आनंदाने साजरा करा, अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान तुम्ही स्वत:च स्वत:ला द्या. कधीही हार मानू नका. निम्मे जग तर महिलांचेच आहे, पण सेवेसाठी सगळे जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे तुमच्यातील जे उत्तम असेल ते देशासाठी द्या.’’

कानिटकर यांची झेप

  • माधुरी कानिटकर पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी बालरोग विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातून बालकांच्या मूत्रपिंड विकारांवर उपचाराचे प्रशिक्षण घेतले आहे.
  • त्या पंतप्रधानांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत. त्या लष्करी दलातील पहिल्या प्रशिक्षित बाल मूत्रपिंडविकार तज्ज्ञ आहेत. पुणे आणि दिल्लीत त्यांनी मुलांच्या मूत्रपिंड विकारावर उपचारासाठी केंद्रे स्थापन केली आहेत. २०१७ मध्ये त्या पुण्याच्या आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या पहिल्या अधिष्ठाता होत्या. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उधमपूर येथे मेजर जनरल (वैद्यकीय) पदाची जबाबदारी स्वीकारली.
  •  लष्करातील महिलांसाठी २०२० हे संस्मरणीय वर्ष ठरले असून याच वर्षी लष्करी दिन आणि प्रजासत्ताक दिन संचलनाचे नेतृत्व प्रथमच तानिया शेरगील या महिला लष्करी अधिकाऱ्याने केले होते.
  • भारतीय लष्करात महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळते. अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान तुम्ही स्वत:च स्वत:ला द्या. कधीही हार मानू नका. निम्मे जग तर महिलांचेच आहे, पण सेवेसाठी सगळे जग तुमच्यासाठी आहे. म्हणून तुमच्यातील जे उत्तम असेल ते देशासाठी द्या.
  • माधुरी कानिटकर, लेफ्टनंट जनरल
  • पुनिता, पद्मावती आणि माधुरी
  • त्रितारांकित अधिकाऱ्यांचे पद नौदलात व्हाइस अ‍ॅडमिरल, स्थलसेनेत लेफ्टनंट जनरल तर हवाई दलात एअर मार्शल या नावाने ओळखले जाते. लेफ्टनंट जनरलपद भूषवण्याचा पहिला मान पुनिता अरोरा यांना आहे. त्यानंतर पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या, तर आता माधुरी कानिटकर या लेफ्टनंट जनरल झाल्या आहेत.

# Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम