चालू घडामोडी :1 एप्रिल 2020

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
153

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 01 April 2020 | चालू घडामोडी :०१ एप्रिल २०२०

चालू घडामोडी – जॉनसन ऍण्ड जॉनसन कंपनीकडून कोरोनावर लस, लवकरच होणार चाचणी

  • आंतरराष्ट्रीय जॉनसन ऍण्ड जॉनसन (Johnson & Johanson) कंपनीने कोरोनावर लस शेधली आहे.
  • कंपनाच्या वैज्ञानिकांनी कोरोनावर लस विकसीत केली असल्याचा दावा केला आहे.
  • शिवाय ट्रायलला लवकरच सुरूवात करण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
  • कोरोना या धोकादायक विषाणूची लागण संपूर्ण जगात तब्बल ७ लाख ८५ हजार ७७७ जणांना झाली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – मोदी सरकारने केली 11 विशेष गटांची स्थापना.

  • भारतामध्ये करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारपर्यंत एक हजार 139 भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. तर देशामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 30 वर पोहचला आहे.
  • तर याच संकटावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेगवेगळ्या सबलीकरण गटांची (Empower Groups) स्थापना केली आहे.
  • तसेच करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा आणि साधनांचा कसा वापर करता येईल, यासंदर्भात काय तयारी पूर्ण झाली आहे या गोष्टींवर हा गट लक्ष ठेवणार आहे.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्येच करोनाविषयक 11 गटांची स्थापना करण्यात आली. या 11 वेगवेगळ्या गटांमध्ये मोदी सरकारमधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
  • पहिला गट हा आरोग्य विषयक आप्तकालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
  • तर या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी निती आयोगाचे सदस्य असणारे डॉक्टर व्ही पॉल यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी –  सौदी अरबच्या अध्यक्षतेखाली द्वितीय जी-20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची आभासी बैठक संपन्न झाली .

  • 31 मार्च 2020 रोजी सौदी अरबच्या अध्यक्षतेखाली द्वितीय जी-20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची आभासी बैठक संपन्न झाली.
  •  बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सहभाग घेतला होता.

महत्वाचे

  •  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रस्तावित जी-20 कृती योजनेस पाठिंबा दर्शविला.
  •  कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी वित्तपुरवठ्याची गरज भागविण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नाविन्यपूर्ण व कल्पक पद्धत विकसित करू शकते असे सीतारमण यांनी सुचविले.
  •  स्वॅप व्यवस्थेच्या मुद्द्यावरून, सीतारमण यांनी विद्यमान संसाधनांचा वापर करून देशाद्वारे आवश्यकतेनुसार त्वरेने तैनात करता येणारी अल्प-मुदतीची लिक्विडिटी स्वॅप सुविधा तयार करण्यासाठी IMF ला प्रोत्साहित केले.

जी-20 समूह

  • आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तीय ध्येयाच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूंसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ‘ग्रुप ऑफ ट्वेंटी’ (किंवा जी-20) हा प्रमुख मंच आहे.
  •  वित्त मंत्र्यांचा आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांचा नवा ग्रुप ऑफ ट्वेंटी (जी-20) फोरम 25 सप्टेंबर 1999 रोजी औपचारिकपणे तयार केला गेला.
  •  या समूहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, युरोपीय संघ (EU), फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, टर्की, ब्रिटन (UK) आणि संयुक्त राज्ये अमेरिका (USA) या देशांचा समावेश आहे.
  •  हा समूह एकत्रितपणे जागतिक GDPच्या 90%, जागतिक व्यापाराच्या 80% आणि जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांचे प्रतिनिधित्व करतो.

# Current Affairs


चालू घडामोडी –  NASAची ‘सनराइजमोहीम

  • सौर कणांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेनी ‘सन रेडिओ इंटरफेरोमीटर स्पेस एक्सपेरिमेंट’ (सनराइज / SunRISE) मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे.
  • ही मोहीम कॅलिफोर्नियाच्या पासाडेना येथे असलेल्या NASAच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीद्वारे व्यवस्थापित केले जात आहे.
  • मोहीम वैज्ञानिकांना सूर्यापासून निघणार्‍या सौर कणांच्या वादळाची कारणे अभ्यासण्यास मदत करणार. या अभ्यासामुळे सूर्याच्या किरणोत्सर्गामुळे अंतराळ वातावरणावर कसा परिणाम होतो याविषयी अधिक माहिती मिळवून सौर वादळातून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांचे संरक्षण करण्यात मदत होणार.
  • या मोहिमेसाठी एक प्रचंड रेडिओ टेलिस्कोप म्हणून कार्यरत असलेल्या सहा ‘क्यूबसॅट’ उपग्रहांच्या जाळ्याचा उपयोग केला जाणार आहे.
  • 1 जुलै 2023 पर्यंत या मोहिमेची संरचना तयार करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी 62.6 दशलक्ष डॉलरचा निधी खर्च केला जाणार आहे.

 # Current Affairs


चालू घडामोडी – UNHRC वर संयुक्त राष्ट्रसंघाकडून (UN) 14 नवीन सदस्यांची निवड 

  • संयुक्त राष्ट्रसंघाकडून (UN) संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क परीषदेवर (UN Human Rights Council) वर नव्या 14 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
  • या सदस्यांना तीन वर्षाचा पदावधी असेल.
  • अर्मेनिया, ब्राझील, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, लिबिया, मार्शल आयलंड, मारूशिनिया, नामेबिया, नेदरलॅंड, पोलंड, प्रजासत्ताक कोरिया, सुदान आणि व्हिनेझुयला ही ती 14 राष्ट्रे आहेत.
  • भारत 2022 पर्यंत UNHRC चा सदस्य राहणार आहे.

 UN Human Rights Council [संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी हक्क परीषद]

  • स्थापना : 15 मार्च 2006
  • संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाची जागा या संस्थेने घेतली आहे.
  • सदस्य: 47 देश (प्रत्येक देशाला तीन वर्षाचा पदावधी असतो)
  • मुख्यालय: जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
  • मानवी हक्काचे संरक्षण, संवर्धन आणि प्रोत्साहनासाठी जबाबदार असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची महत्त्वाची संस्था.

 # Current Affairs

आजचे चालू घडामोडीचे PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम