दिनविशेष १९ नोव्हेंबर | 19 November

जागतिक शौचालय दिन | आंतरराष्ट्रीय पुरूष दिन | महिला उद्योजकता दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
398

१९ नोव्हेंबर – जागतिक शौचालय दिन | आंतरराष्ट्रीय पुरूष दिन | महिला उद्योजकता दिन

१९ नोव्हेंबर  : जन्म

  • १७२२: आधुनिक स्टेथॅस्कोपचे जनक लिओपोल्ड अॅव्हेल ग्रुबर यांचा जन्म.
  • १८२८: झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १८५८)
  • १८३१: अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)
  • १८३८: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)
  • १८४५: भारतीय-इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक एग्नेस जिबर्ने यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९३९)
  • १८७५: प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे १९५०)
  • १८७७: व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९४७)
  • १८८८: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९४२)
  • १८९७: सह्याद्री ग्रंथांचे लेखक व कायदेपंडित स.आ. जोगळेकर यांचा जन्म.
  • १९०९: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)
  • १९१४: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रामकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)
  • १९१७: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४)
  • १९२२: हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ – मुंबई)
  • १९२८: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारा सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१२)
  • १९३८: टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टमचे संस्थापक टेड टर्नर यांचा जन्म.
  • १९४२: केल्विन क्लेन इंक चे संस्थापक केल्विन क्लेन यांचा जन्म.
  • १९५१: हिंदी चित्रपट अभिनेत्री झीनत अमन यांचा जन्म.
  • १९७४: भारतीय अभिनेते आणि गायक अरुण विजय यांचा जन्म.
  • १९७५: मिस युनिव्हर्स आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन यांचा जन्म.
  • १९७६: ट्विटर चे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांचा जन्म.

 

 

१९ नोव्हेंबर : मृत्यू

  • १८८३: जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८२३)
  • १९७१: मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये यांचे निधन.
  • १९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स  यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)
  • १९९९: कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे निधन.

 

 

 

१९ नोव्हेंबर : महत्वाच्या घटना

  • १९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • १९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.
  • १९६९: फूटबॉलपटू पेले यांनी १,००० वा गोल केला.
  • १९६९: अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
  • १९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.
  • १९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.
  • १९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.
  • २०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान..

 

आंतरराष्ट्रीय पुरूष दिन | महिला उद्योजकता दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम