चालू घडामोडी : 12 नोव्हेंबर 2019 Latest
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 12 November 2019 | चालू घडामोडी : 12 नोव्हेंबर 2019
चालू घडामोडी – ट्रम्प महाभियोगप्रकरणी उद्यापासून खुली सुनावणी
- अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग चौकशीत खुली सुनावणी बुधवारपासून सुरू होत असून त्यात डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्षातील स्फोटक शक्तिप्रदर्शन बघायला मिळणार आहे.
- ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार जो बिदेन व त्यांच्या पुत्राच्या युक्रे नमधील व्यवहारांची चौकशी करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणला होता.
- प्रतिनिधिगृहाच्या गुप्तचर समितीपुढे दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी सुरू होत असून ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई झाली तर अशी कारवाई होणारे ते अमेरिकी इतिहासातील तिसरे अध्यक्ष ठरणार आहेत.
- त्या परिस्थितीत त्यांच्यावर अध्यक्षांच्या कर्तव्यात कसूर करण्याच्या आरोपाखाली सिनेटमध्ये सुनावणी केली जाईल. प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅट पक्षाचे वर्चस्व असून २०१९ च्या अखेरीस महाभियोगाची कारवाई अंतिम टप्प्यात पोहोचू शकते.
- पण सिनेटमध्ये रिपब्लिकनांचे बहुमत असल्याने ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवून पदावरून काढून टाकणे सोपे नाही.
- बुधवारी प्रतिनिधिगृहाच्या गुप्तचर समितीपुढे जाहीर सुनावणी सुरू होईल. यापूर्वी सहा आठवडे बंद दाराआड जाबजबाब झाले होते.
- आतापर्यंतच्या सुनावणीत ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी कशा प्रकारे युक्रेनवर दबाव आणला याचे पूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.
- ट्रम्प यांचे व्यक्तिगत वकील रूडी गिलीयानी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदमीर झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणून डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार जो बिदेन व त्यांच्या मुलाची चौकशी सुरू करण्यास सांगितले होते.
- युक्रेनमधील राजदूत विल्यम टेलर व सहायक उप परराष्ट्र मंत्री जॉर्ज केंट यांची साक्ष बुधवारी नोंदवली जाणार असून शुक्रवारी माजी राजदूत मारी योव्हानोविच यांचे जबाब होणार आहेत. या जाहीर सुनावणीतही ट्रम्प यांच्याविरोधात पुरावे गोळा करणे व काही रिपब्लिकनांचा यात पाठिंबा मिळवणे हा हेतू आहे.
- दोन्ही पक्षांना त्यांच्या साक्षीदारांना समन्स पाठवण्याचा अधिकार असेल, पण गुप्तचर समितीचे प्रमुख अॅडम शिफ हे ज्यांचा ट्रम्प यांच्यावरील आरोपांशी दुरान्वयानेही संबंध नाही अशा रिपब्लिकन साक्षीदारांना रोखू शकतात.
चालू घडामोडी – वाहन विक्री अखेर घसरणीतून बाहेर
- आर्थिक मंदीचा फटका सहन करणाऱ्या देशातील वाहन उद्योगाला अखेर विक्री वाढीने हात दिला आहे. ऐन सण-समारंभाच्या मोसमात कंपन्यांची वाहन विक्री वाढली आहे.
- ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहन विक्री ०.२८ टक्क्य़ांनी वाढून २,८५,०२७ वर पोहोचली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये वाहन विक्री २,८४,२२३ होती. सलग ११ महिन्यातील घसरणीनंतर देशातील वाहन विक्री वाढली आहे.
- सण-समारंभातील मागणीला नव्या वाहनांची जोडही मिळाली आहे. सर्व गटातील वाहने मिळून मात्र वार्षिक तुलनेत १२.७६ टक्क्य़ांनी घसरून यंदाच्या ऑक्टोबरमध्ये २१,७६,१३६ पर्यंत आली आहे. वर्षभरापूर्वी या वाहनांची विक्री २४,९४,३४५ होती.
- एप्रिल ते ऑक्टोबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री २० टक्क्य़ांनी घसरली आहे.
- ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत कार विक्री ६.३४ टक्क्य़ांनी घसरत १,७३,६४९ वर येऊन ठेपली. गेल्या ऑक्टोबरमध्ये ती १,८५,४०० होती. गेल्या महिन्यात बहुपयोगी वाहन विक्री मात्र २२.२२ टक्क्य़ांनी झेपावत १,००,७२५ पर्यंत पोहोचली. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती ८२,४१३ होती.
चालू घडामोडी – आशियाई नेमबाजी स्पर्धा : सौरभचा ‘रौप्यवेध’
- सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सोमवारी रौप्यपदक जिंकताना आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील भारताची यशोपताका फडकवत ठेवली आहे.
- १७ वर्षीय विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभने २४४.५ गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले.
- उत्तर कोरियाच्या किम संग गुकने २४६.५ गुण मिळवत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. इराणच्या फोरॉघी जावेदने (२२१.८ गुण) कांस्यपदक प्राप्त केले.
- लुसेल नेमबाजी संकुलात चालू असलेल्या या स्पर्धेत सौरभ आणि अभिषेक वर्मा प्रत्येकी ५८३ गुणांसह अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या क्रमांकासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
- आठ जणांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत अभिषेकने १८१.५ गुण मिळवल्याने पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
- याआधीच्या स्पर्धामध्येच सौरभ आणि अभिषेक यांनी ऑलिम्पिकमधील स्थानांची निश्चिती केली आहे.
- १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारत आणि चीन यांनी दोन स्थानांची आधीच निश्चिती केल्याने इराण, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांना ऑलिम्पिक स्थाने देण्यात आली.
चालू घडामोडी – संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीवर मनमोहन सिंग नियुक्त
- माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचे आधीचे सदस्य दिग्विजय सिंह यांच्या जागी डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली आहे.
- दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्तीही नायडू यांनीच केली आहे. मनमोहन सिंग यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचा राजीनामा दिला होता.
- मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान देशाचे अर्थमंत्री होते, तसेच सप्टेंबर २०१४ ते मे २०१९ दरम्यान ते अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य व राज्यसभेचे सदस्य होते.
- नंतर जूनमध्ये त्यांची राज्यसभेची मुदत संपली व ऑगस्टमध्ये राजस्थानातून ते राज्यसभेवर पुन्हा बिनविरोध निवडून आले.
- मागील काळात अर्थविषयक स्थायी समितीने वस्तू व सेवा कर, निश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदी हे विषय हाताळले होते. दरम्यान, आता नवीन बदलात दिग्विजय सिंह यांना नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीचे सदस्यपद देण्यात आले आहे.
# Current Affairs
चालू घडामोडी – ‘आरसेप’बाहेर राहिल्यास भारतात एकही बहुराष्ट्रीय कंपनी येणार नाही
- आरसेपवर अन्य १५ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि आपण बाहेरच राहिलो तर कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीला भारतात यावेसे वाटणार नाही, असे मत निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी व्यक्त केले आणि आरसेप हे भारताच्या हिताचेच असल्याचे अधोरेखित केले.
- भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणूकदार म्हणून आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि त्यांना आसियान बाजारपेठेत करमुक्त प्रवेश मिळाला तर त्यांना भारतात स्थिर होण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन मिळेल. जर आरसेपवर अन्य १५ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि आपण बाहेरच राहिलो तर कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीला येथे यावेसे वाटणार नाही, असे पानगढिया यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
- आरसेपमध्ये चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह १० आसिआन देश आहेत, चर्चा २०१२ मध्ये सुरू झाली होती आणि ती २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही देशांमधील मतभेदांमुळे चर्चा लांबणीवर पडली. भारताने आरसेपमध्ये सहभागी न होण्याचे जाहीर केल्यानंतर पानगढिया यांनी हे मत व्यक्त केले आहे.
# Current Affairs
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents