चालू घडामोडी : 11 नोव्हेंबर 2019 Latest
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 11 November 2019 | चालू घडामोडी : 11 नोव्हेंबर 2019
चालू घडामोडी – माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन
- निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजाणीतून भारतीय निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणारे आणि राजकारण्यांमध्ये दरारा निर्माण करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे चेन्नई येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- ते ८६ वर्षांचे होते.
- मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांची १२ डिसेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली.
- त्यानंतरची सहा वर्षांची त्यांची कारकिर्द ऐतिहासिक ठरली. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होताच त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलला.
- निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक केली.
- आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करून त्यांनी राजकारण्यांमध्ये निवडणूक आयोगाचा धाक निर्माण केला. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत सुधारण घडवून आणल्या.
- त्यांच्या आधी त्यांच्याएवढे धाडस क्वचितच एखाद्या अधिकाऱ्याने दाखवले असेल.
- ते निवृत्त झाल्यानंतर आलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यांचा कित्ता गिरवला. निवडणूक आयोग ही लोकशाहीतील महत्त्वाची स्वायत्त संस्था असून ती राजकीय हस्तक्षेपापलिकडे असते, याची जाणीव शेषन यांच्या कार्यपद्धतीमुळेच नागरिकांना प्रथमच प्रकर्षांने झाली.
चालू घडामोडी – हितेश देव सरमा आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे नवे समन्वयक
- आसाम राज्यात चाललेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे नवीन समन्वयक म्हणून हितेश देव सरमा ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- हितेश देव सरमा सन 1986च्या तुकडीतले आसाम नागरी सेवा (ACS) अधिकारी आहेत.
- राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens -NRC) यामध्ये देशातल्या अधिकृत नागरिकांची नोंद होते.
- ज्या नागरिकांचे नाव NRCमध्ये नसते त्याना अवैध मानले जाते.
- NRCनुसार 25 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांना भारतीय मानले जात आहे.
चालू घडामोडी – IndAIR’: हवेची गुणवत्ता यासंदर्भातले देशाचे पहिले परस्परसंवादी ऑनलाइन व्यासपीठ
- वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI) या संस्थेनी ‘IndAIR’ (इंडियन एयर क्वालिटी इंटरएक्टिव रिपॉझिटरी) या नावाने हवेची गुणवत्ता याच्या संदर्भातले देशाचे पहिले परस्परसंवादी ऑनलाइन व्यासपीठ (भांडार) विकसित केले आहे.
- भारतातली हवेची गुणवत्ता या विषयात अभ्यास करण्यासाठी आणि संशोधनांसाठी माहिती सहज उपलब्ध व्हावी हे उद्दीष्ट ठेवून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
चालू घडामोडी – रेल्वेची खासगी तत्त्वावरील तेजस एक्स्प्रेस फायद्यात
- रेल्वेने ‘खासगी तत्त्वावर’ चालवलेली पहिलीच गाडी फायद्यात धावली आहे. आयआरसीटीसीतर्फे संचालित तेजस एक्स्प्रेसने यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवळपास ७० लाखांचा नफा मिळवला असून, तिकिटांच्या विक्रीतून सुमारे ३.७० कोटींचा महसूल मिळवला आहे.
- देशातील ५० रेल्वे स्थानकांचा जागतिक दर्जानुसार विकास करण्याचा आणि आपल्या जाळ्यामध्ये १५० गाडय़ा चालवण्याची खासगी ट्रेन ऑपरेटर्सना परवानगी देण्याचा रेल्वेचा प्रयत्न असून; इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची लखनौ- दिल्ली तेजस एक्स्प्रेस हा त्याचाच एक भाग आहे.
- ५ ऑक्टोबरला सुरू झाल्यापासून ही गाडी सरासरी ८० ते ८५ टक्के प्रवाशांसह धावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- ५ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत (२१ दिवस, कारण ही गाडी आठवडय़ातून ६ दिवस धावते) ही गाडी चालवण्यासाठी आयआरसीटीसीला ३ कोटी रुपये खर्च आला.
- ही अत्याधुनिक गाडी चालवण्यासाठी दररोज सुमारे १४ लाख रुपये खर्च करणाऱ्या रेल्वेच्या या उपकंपनीने प्रवासी भाडय़ातून दररोज सुमारे १७.५० लाख रुपये कमावले.
- लखनौ- दिल्ली मार्गावरील तेजस एक्स्प्रेसच्या रूपात गैर रेल्वे ऑपरेटरमार्फत आणि आपल्या स्वत:च्या उपकंपनीमार्फत एखादी गाडी चालवण्याचा रेल्वेचा हा पहिलाच अनुभव आहे.
- वैविध्यपूर्ण भोजन, २५ लाखांपर्यंतचा मोफत विमा आणि गाडीला उशीर झाल्यास नुकसानभरपाई, यांसारखे अनेक फायदे आयआरसीटीसीने ‘तेजस’च्या प्रवाशांना दिले आहेत.
- # Current Affairs
चालू घडामोडी – दीपक चहर ठरला ‘असा’ विक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू
- बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात दीपक चहरने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते.
- या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली.
- या सामन्यात दीपक चहरने भेदक मारा केला. त्याने त्याच्या ३.२ षटकांमध्ये केवळ ७ धावा दिल्या आणि तब्बल ६ बळी टिपले. त्यात त्याने एक हॅटट्रिकदेखील घेतली.
- त्याचसोबत त्याने टी २० इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.
- या आधी हा विक्रम श्रीलंकेचा फिरकीपटू अजंता मेंडिस याच्या नावे होता.
- त्याने २०१२ साली झिम्बाब्वे विरूद्ध ८ धावा देत ६ बळी टिपले होते.
- विक्रम १ धाव कमी देत दीपकने आपल्या नावावर केला.
- दरम्यान, भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन हे दोघे स्वस्तात परतल्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. राहुलने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तर युवा श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६२ धावा करत आपले पहिलेवहिले टी २० अर्धशतक झळकावले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले.
- या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने अत्यंत खराब खेळी केली. नईम आणि मिथून यांच्यात चांगली भागीदारी होत असताना मिथून २७ धावांवर बाद झाला. एकीकडे गडी बाद होत असताना धमाकेदार खेळी करणारा मोहम्मद नईमही मोक्याच्या वेळी ८१ धावांवर माघारी परतला. त्यामुळे बांगलादेशचा डाव १४४ धावांत आटोपला. दिपक चहरने एका हॅटट्रिक घेत ७ धावांत ६ बळी टिपले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents